[email protected] : औरंगाबादेत आज 423 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 27 हजारांचा टप्पा

जिल्ह्यात सध्या 5 हजार 710 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे जिल्ह्यात 792 जणांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज पुन्हा 423 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 27 हजार 712 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 710 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत कोरोनामुळे 792 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 21 हजार 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. आज आढळलेल्या 423 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 145 तर मनपा हद्दीतील 84, अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 92, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 102 आणि ग्रामीण भागात 48 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (145)

साठे नगर, वाळूज (1), वडगाव कोल्हाटी (1), केकटजळगाव, पैठण (1), टाकळी सागज, वैजापूर (1), बाबरा, फुलंब्री (1), औराळा, कन्नड (1), विटा कन्नड (1), रोटेवस्ती, वैजापूर (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), देवगिरी नगर, बजाज नगर (1), जय भवानी कॉलनी, बजाज नगर (1), जय भवानी चौक, भाजी मंडई परिसर, बजाज नगर (1), गोदावरी सो., बजाज नगर (1), मनिषा नगर,वाळूज (1), गणेश नगर, वाळूज (2), शिवाजी चौक, विटावा (2), न्यू हनुमान नगर, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), मारोती मंदिर, कासोदा (1), पिशोर (5), शिऊर (1), तितरखेडा लोणी (1), हस्ता, कन्नड (2), करमाड (2), खुलताबाद (2), पाचोड (5), राम नगर, पैठण (2), नाथ विहार,पैठण (1), नारळा, पैठण (5), पीठ उंबर गल्ली, पैठण (2), पिंपळवाडी, पैठण (1), शिवनगर, पैठण (1), इसारवाडी, पैठण (1), रेहाना कॉलनी, गंगापूर (1), लासूर स्टेशन (2), शिक्षक कॉलनी, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (10), लासूर रोड, गंगापूर (4), लखमापूर, गंगापूर (1), बगडी, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), सोनार गल्ली, गंगापूर (1), उपजिल्हा रुग्णालय परिसर, गंगापूर (2), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), भवन, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), उकडगाव, वैजापूर (2), आंबेडकर नगर, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), व्यंकटेश नगर, वैजापूर (1), म्हसोबा चौक, वैजापूर (1), अगरसायगाव (2), भारतवाडी, टाकळी सागज (2), बोराड वस्ती, हिलालपूर (6), औरंगाबाद (19), फुलंब्री (1), गंगापूर (3), कन्नड (4), सिल्लोड (10), वैजापूर (4), पैठण (4), सोयगाव (3)

मनपा (84)

पैठण गेट (1), देवानगरी (1), घाटी परिसर (1), अन्य (4), बुड्डीलेन (1), नॅशनल कॉलनी (1), शिवज्योती कॉलनी (1), सुधाकर नगर (1), रचनाकर कॉलनी (4), वेदांत नगर (4), गांधी नगर (1), बन्सीलाल नगर (6), क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर (1), लालमन कॉलनी (3), पद्मपुरा (1), सारा प्रभावती सो., सावंगी (1), बालाजी नगर (1), सावंगी (1), उस्मानपुरा (1), एन नऊ सिडको (1), प्रताप नगर (1), स्नेहवर्धिनी कॉलनी, जवाहर नगर (1), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (1), सातारा पोलिस स्टेशन परिसर (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), ऑरेंज सिटी, सातारा परिसर (2), एचपी गॅस एजन्सी, सातारा परिसर (1), सहकार नगर (2), भारतमाता नगर (1), एन बारा हडको (1), एन नऊ शिवनेरी कॉलनी (1), एन सात, पोस्ट ऑफिस जवळ (2), पारिजात नगर (2), एन दोन न्यू एस टी कॉलनी (1), एन बारा भारतमाता मंदिर (1), एन अकरा सुदर्शन नगर (1), कैलाश नगर (1), मिटमिटा (2), संजय नगर (1), देवळाई परिसर (3), जय भवानी नगर (1), एन बारा टीव्ही सेंटर (1), गारखेडा परिसर (2), देशमुख नगर (1), चुना भट्टी (1), पुंडलिक नगर (1), तारांगण नगर (3), राधास्वामी कॉलनी (1), एन दोन सिडको (1), राम नगर (1), मयूर पार्क (1), मुकुंदवाडी (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), हर्सुल (2), हर्सुल सावंगी (1), सिडको (1), सौजन्य नगर, बालाजी नगर (1)

सिटी एंट्री पॉइंट (92)

वाळूज एमआयडीसी (3), न्यू सौजन्य नगर (1), सिडको पाणी टाकीजवळ (1), शहानूर वाडी (1), रांजणगाव (2), नाईक नगर (1), शाहू नगर (1), एएस क्लब जवळ (2), पडेगाव (1), गजानन नगर (1), व्हीजन सिटी कांचनवाडी (1), निपाणी (1), भारतमाता नगर (2), बेगमपुरा (2), न्यू हनुमान नगर (1), अजिंठा, सिल्लोड (1), एन एक सिडको (1), शेंद्रा एमआयडीसी (2), एन बारा टीव्ही सेंटर (1), जवाहर कॉलनी (1), बजाज नगर (6), गंगापूर (1), साऊथ सिटी (1), एन चार पारिजात नगर (1), जाधववाडी (2), आडगाव, कन्नड (1), एन आठ सिडको (7), एन दोन सिडको (2), एन अकरा, टी व्ही सेंटर (5), राधास्वामी कॉलनी (1), समृद्धी महामार्ग कर्मचारी (1), नवजीवन कॉलनी (1), पिसादेवी (4), हर्सुल सावंगी (1), एन सात सिडको (1), शेंद्रा एमआयडीसी (1), शेंद्रा (2), सुंदरवाडी (1), मयूर पार्क (1), कुंभेफळ (1), चिकलठाणा (3), टोणगाव (1), उत्तरानगरी (1), एन सहा सिडको (2), कांचनवाडी (6), पैठण (2), बीड बायपास (4), सातारा परिसर (1), नारेगाव (1), विजयंत नगर (2), पडेगाव (1)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील 51 वर्षीय पुरूष, कन्नडमधील 73, रांजणगाव शेणपूजी येथील 60, चिकलठाणा येथील 30, वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथील 45, शहरातील हमालवाडातील 49, गंगापूर तालुक्यातील बगडी येथील 50, कन्नड तालुक्यातील अडगावातील 44 वर्षीय पुरूष, लाडसावंगीतील 60 वर्षीय स्त्री आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात कन्नड तालुक्यातील नागद येथील 65 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies