हिंगोलीत मुंबईवरून आलेले आणखी 6 जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 107

हिंगोली - हळूहळू हिंगोली जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असताना मुंबईतून आलेल्या नागरिकांमुळे हिंगोलीत रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई येथून औंढा तालुक्यात आलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीसह वसमत तालुक्यातील 5 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 107 एवढी झाली आहे. त्यातील 89 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्यास्थितीत 18 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून. त्यांच्यात कोणते ही गंभीर लक्षणे नाहीयेत.AM News Developed by Kalavati Technologies