वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे - खासदार संजय जाधव

परभणी जिल्ह्यातील अपघातात अंदाजे 9 ते 10 टक्के घट झाली आहे.

परभणी | दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता रस्ता सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. तरी वाहन चालकांनी वाहन चालवितांना सामाजिक बांधिलकेतून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करुन अपघातमुक्त परभणी जिल्हा करावा. असे आवाहन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केले. 31 वे रस्ता सुरक्षा अभियान 2020 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते.

गेल्यावर्षी परभणी जिल्ह्यातील अपघातात अंदाजे 9 ते 10 टक्के घट झाली आहे. रस्ता सुरक्षित करण्यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी वाहतुक नियमावली या पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातात अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करणारे डॉ. संतोष घुले, मोटार वाहन निरीक्षक अभिजित वाघमारे, अभिजित तरकसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरवदे, प्रशांत वाव्हळे, बसचालक गजानन गायकवाड यांचा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिसरातील वाहनांवर रिफ्लेक्टर्स लावण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies