गैरमार्गाने निवडणुकीत विजय संपादन केल्याने, आमदार अब्दुल सत्तारांचा आमदारकी रद्द करा - अजबराव मानकर

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात पैशाच्या बळावर सत्तार निवडूण आले असून, त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे

औरंगाबाद । शिवसेनेचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना 4 ऑक्टोबर रोजी सिल्लोड तालुक्यातील जिवरग टाकळी या गावातील एका युवकाने मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सत्तार यांनी उत्तर देत प्रत्यक्ष कबुली दिली होती की, त्यांनी विधानसभा निवडणुकीत लोकांना मतदानासाठी प्रचंड पैसा वाटला आहे. त्यामुळे आता विरोधकांनी सत्तार यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तसेच सत्तार यांना विविध पक्षांमार्फत निवडणुका लढवल्या असून, प्रत्येकवेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असल्याचं ही विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. सत्तार हे पैशाच्या जोरावर निवडून आले असून, त्यांची आमदारकी रद्द करावी. अशी मागणी अजबराव पाटीलबा मानकर यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies