'हौसेला मोल नाही', बुलडाण्यातील व्यक्तीने स्वतः साठी बनवला चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्क

65 ग्रॅमच्या या मास्कची किंमत तब्बल 3 लाख 70 हजार रुपये एवढी आहे

बुलडाणा | एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतांना सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा स्थितीतही चिखली येथील एका व्यक्तीने चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. त्यामुळे ‘हौसेला मोल नसते’चा प्रत्यय बुलडाण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे चिखली शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर चर्चा आहे

देशभरात सध्या कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी दीपक वाघ या गोल्ड मॅनने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा सोन्याचा मास्कच बनवून घेतला आहे. या मास्कची किंमत अंदाजे 3 लाख 60 हजार रुपये आहे. दीपक वाघ यांना सोन्याची खूप आवड आहे. त्यांचा गळा, हात नेहमीच सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला असतो. कोरोना काळात काही दिवसांपूर्वी माध्यमात आलेल्या बातम्या पाहून आपणही सोन्याचा मास्क तयार करावा, अशी कल्पना सुचली आणि त्यांनी तसा मास्कही तयार करुन घेतला.

यापूर्वी राज्यातील अनेक भागातून सोन्याचा मास्क, चांदीचा मास्क तयार करुन घेतल्याचं समोर आलं आहे. त्याच प्राश्वभूमीवर चिखली येथे वाघ यांनी बनवलेला सोन्याचा मास्क याची चार्चा सध्या संपूर्ण जिल्हाभर होत आहे. दिपक वाघ यांनी चिखली शहरातल्या आपल्या मित्राच्या दुकानातून हा मास्क तयार करुन घेतला आहे. त्यांचे मित्र प्रसाद काछवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मास्कचं एकूण वजन 65 ग्रॅम असून आज त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे जवळपास 3 लाख 70 हजार रुपये किंमत आहे.AM News Developed by Kalavati Technologies