अंगणवाडीत लहान मुलांना मिळणाऱ्या पोषक आहाराचा काळाबाजार

अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महिलांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पुरक पोषक आहारामध्ये काळाबाजार होत असल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे

डोंबिवली । अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महिलांना शासनाकडून पुरक पोषक आहार दिला जातो. त्यामध्ये मात्र "भ्रष्टाचाराची किड" लागली आहे. निळजे सेक्टर, डोबिवली पुर्व अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मधील लहान मुलांना व गर्भवती महिलांना शासनाकडून पुरक पोषक आहार योजनेतील जीवनावश्यक वस्तुच्या वितरणात अनियमीतता होत असल्याबाबत गोपनीय माहिती जिल्हा परिषद ठाणे, अधिकारी संतोष भोसले आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना मिळाली माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती लगेच मानपाडा पोलिसांना कळवली. तात्काळ मानपाडा पोलिसांनी ट्रॅप लावत काळाबाजार होत असलेला टेम्पो रंगेहात पकडला आहे.

या टेम्पोमध्ये तेल, गहू, तांदूळ, हळद, मसाला, साखर यांची पाकिटे आणि इतर आवश्यक असलेले वस्तू आढळून आल्या. अन्नधान्य आणि साहित्याची एकूण किंमत 59,813 इतकी असून सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर काळाबाजार अंगणवाडी परीवेक्षीका सुषमा घुगे ह्या करत असून पोलिसांनी रंगेहात पकडले असून कलम 420 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies