भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा श्रीक्षेत्र परचंडा येथुन शुभारंभ

राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा हजारे यांच्या रडारवर, आमदार विनायकराव पाटील यांचा घणाघाती आरोप

लातूर । अहमदपूर मतदारसंघातील 300 कोटी रुपयांचा साखर कारखाना तीस कोटी रुपयांना घेऊन माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.,निवडून येऊन हे मतदार संघाचा विकास न करता स्वतःचा विकास करून घेणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या रडारवर असल्याचा आरोप भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार विनायकराव पाटील यांनी केला.

श्रीक्षेत्र परचंडा येथे महायुतीचे उमेदवार आमदार विनायकराव पाटील यांच्या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप किशन महाराज प्रचंडेकर हे होते.

यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की, माझ्यावर बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा कसलाही फरक पडणार नसून पक्षाने त्यांना खूप मोठं केलं होतं. परंतु त्यांनी पक्षनिष्ठा वेशीला टांगुन पक्षाशी गद्दारी केली. त्यांना त्यांची जागा मतदार दाखवतील त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विचार सोडून द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी व सर्व स्तरातील घटकांसाठी जी विकास कामे केली आहेत. त्याच विकासाच्या जोरावर मी विक्रमी मतांनी निवडून येण्याची ग्वाही त्यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies