भाजपा ओबीसी नेत्यांना डावलतय ? पंकजा मुंडेची खदखद 12 तारखेला समजणार

पंकजा मुंडे नेमका काय निर्णय घेतील याकडे सबंध महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे

बीड । दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका भावनिक पोस्टमुळे पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत हे स्पष्ट होत आहे. 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर मोठा निर्णय घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे नेमका काय निर्णय घेतील याकडे सबंध महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे कार्य संबंध महाराष्ट्रने पाहिलं होतं. संघर्ष यात्रेमुळे पंकजा मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्याचंच फलित म्हणून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आलं होतं. पहिल्यांदाच भाजपकडून राज्यात ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडेंना दिला होता. भाजपच्या सत्तेची पाच वर्ष संपली तसेच भाजपमधील ओबीसी चेहऱ्यांना डावलण्यात आले. त्यात प्रामुख्याने एकनाथ खडसे यांची वर्णी लागते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसीचा मातब्बर चेहरा म्हणून असलेल्या पंकजा मुंडे देखील प्रचंड मतांनी पराभूत झाल्या. यामागे भाजपमधील कुटिल कारस्थान कारणीभूत असल्याचा समोर येते. तशी चर्चाही जोरदार सुरूच आहे. हाती आलेली सत्ता गमावल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान झालेत. त्यामुळेच भाजपमधील ओबीसी प्रचंड नाराज दिसत आहे. येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे निर्णय घेणार आहेत. तो निर्णय नेमका काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र या मेळाव्यात पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो समाजहितासाठी असेल आणि आणि राज्याच्या विकासासाठी असेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटते.

गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी आणि भाजप पक्ष घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी एकनिष्ठ होऊन पक्षासाठी काम केलं आणि त्यांचाच वारसा पंकजा मुंडे पुढे चालवत आहेत. पंकजा मुंडे यांच्या पोस्टमध्ये मी मुंडे साहेबा मुळेच राजकारणात आले. हा देखील उल्लेख आहे. त्यामुळे ज्या मुंडे साहेबांनी भाजप पक्षाची एकनिष्ठ राहून काम केलं. त्या भाजपला पंकजा मुंडे सोडचिठ्ठी देतील असं वाटत नाही. मात्र त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चेला चांगलंच उधान आल आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अशी पोस्ट केली असली तरी मुंडे साहेबांनी कायमच लोकांमध्ये राहून राजकारण केलं आणि पंकजा मुंडे ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकतच लोकांमध्ये राहून राजकारण करत आहेत. त्यामुळे त्या भाजपमध्ये राहूनच मुंडे साहेबांचा वारसा पुढे चालवतील असं ही जाणकार सांगतात.

भावनिक राजकारणाच्या मुद्यावरून पंकजा मुंडेच नाव नेहमीच पुढे केलं जातं यावरून विरोधक अनेकदा त्यांच्यावर टीका देखील करतात. मात्र या फेसबुक पोस्ट नंतर पंकजा मुंडे खरंच भाजप पक्षातील काही लोकांवर नाराज असतील तर 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय निर्णय घेतील. हे त्याच दिवशी समजणार आहे हे निश्चित.AM News Developed by Kalavati Technologies