पुणे । पुणे एल्गार परिषदेमध्ये हिंदु धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केलेल्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी पुण्यातील भाजप नेत्यांनी केली आहे. मंगळवारी पुणेतील एल्गार परिषदेवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. 'शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती पुणेतील एल्गार परिषदेत हिंदुविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतर राज्यसरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात काय मोगलाई आली आहे का. तर हिंदु रस्त्यावर पडलेत का?' असा प्रश्न त्यांनी केला आहे. या आक्रमक भुमिकेनंतर पुण्यातील भाजप नेत्यांनी शरजीलला अटक करण्याची मागणी केली आहे. तर अशा भडकाऊ वक्तव्या बद्दल भाजप आक्रमक झाला आहे.
राज्यात मोगलाई आली आहे का..; शरजील प्रकरणावरून भाजप आक्रमक
पुणे एल्गार परिषदेमध्ये हिंदु धर्मियांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला अटक करण्यात यावी. अशी मागणी भाजपाने केली आहे
