बीड जिल्ह्यातील धारूर शहरात माजी नगराध्यक्षाच्या पतीचा खून, शहरात खळबळ

जो पर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही.

बीड | जिल्ह्यातील धारूर शहरातील माजी नगराध्यक्षाचे पती नामदेव शिनगारे यांचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. यामुळे धारूर शहरात तणावाचे वातावरण आहे. धारूर शहरातील माजी नगर अध्यक्षाचे पती तसेच राजर्षी शाहु महाराज पतसंस्थेचे चेअरमन नामदेव शिनगारे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तर शहरात तणावाचे वातावरण आहे. जो पर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत दोन संशियतांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक पालवे हे करत आहेतAM News Developed by Kalavati Technologies