संचारबंदीमुळे गावाकडे परतणा-या ऊसतोड कामगारांचे हाल

अन्नपाण्याविना करावा लागतोय प्रवास

बीड | ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. यात डोंगर भाग असल्याने धारूर तालुक्यात ऊसतोड मजुरांची संख्या जास्त आहे. सध्या ऊस तोडणी करून आपल्या गावाकडे परतणा-या कामगाराना कोरोनामुळे लागू असणाऱ्या संचारबंदीचा फटका जागोजागी बसत आहे. अन्न व पाण्याविना मनात भिती धरून हा प्रवास करावा लागत आहे. हे कामगार यामुळे हे ऊसतोड कामगार गावी परतताना हैराण होऊन गेले आहेत.

धारूर तालूक्यातून व बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगार कर्नाटक व पश्चीम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातात. यावर्षी बहूतांशी कामगार जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून अपू-या ऊसा मुळे परत आले होते. माञ धारूर तालूक्यातील तिस ते चाळीस हजार तर जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा जास्त कामगार अद्याप बाहेर होते. ते कामगार काम संपल्याने परतत आहे. दरम्यान संचारबंदी असल्याने जागो जागी त्यांना अडवले जात आहे. रस्त्याने येताना चारशे ते तिनशे किंमीचा प्रवास करतान अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अन्न पाण्याविना हा प्रवास करण्याची वेळ या ऊसतोड कामगारांवर आली आहे.

आपआपल्या गावापर्यंत सुखरूप जाऊ का या चिंतेने जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हे कामगार या गंभीर परिस्थितीत गावात पोहचायचे या हेतूने अनेक संकटे सहन करत हा प्रवास करत आहेत. या कामगाराचा सुखरूप प्रवास व्हावा ते आपआपल्या गावात पोहचावे यासाठी शासनाने सहकार्य करावे आशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भांगे यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies