अयोध्या । निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी आनंदोत्सव साजरा करू नका

अयोध्या येथील निकालाच्या पार्श्वभूमीवर भोकर येथे शांतता कमिटीची बैठक

नांदेड  । अयोध्या येथील वादग्रस्त जागेसंदर्भा येत्या काही दिवसात निकाल सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करून समाजात सलोखा व भाईचारा अबाधित राहील या हेतूने आपण पुढील दिवसात राहायचे असे अवाहन भोकरचे पोलीस उपविभागीय अधिकारी बी मुदिराज, तहसीलदार भरत सूर्यवंशी, निरीक्षक विकास पाटील यांनी सर्व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले, तर सायबर सेल सर्व व्हाट्सअप ग्रुप वर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने कोनीही धर्मा धर्मात तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट पाठवू नये अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

निकलानंतर कोणतेही बॅनर, अथवा मिरवणूक, मिठाई वाटने, असे कुठलेच कृत्य करू नये अशा प्रकारची समज देण्यात आली. यावेळी भोकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होतीAM News Developed by Kalavati Technologies