अयोध्या प्रकरण । भोकरदन शहरात पोलिसांच्या वतीने गुरुवारी पथसंचलन

पोलिस प्रशासन ही कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अलर्ट आहेत

भोकरदन । आगामी अयोध्या निकालाच्या अनुषंगाने भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भोकरदन शहरात सराफा मार्केट, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, जालना रोड आदी भागात पोलिसांनी पथसंचलन केले. अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हणून त्याचाच एक भाग म्हणून पोलिस प्रशासन ही कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अलर्ट आहेत. भोकरदन शहर हे अत्यंत शांतता प्रिय शहर म्हणून प्रसिद्ध आहे हे विशेष.AM News Developed by Kalavati Technologies