औरंगाबाद : सर्वसाधारण सभेत डोक आपटून घेतल्याने नगरसेविकेला आली भोवळ

...सरळ भिंतीवर डोकं आपटून घेतलं

औरंगाबाद । औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज पुन्हा एकदा ऱाडा झालेला पाहायला मिळाला. मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे हे आपल्या दालनांमध्ये नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी सर्वसाधारण सभेत केला. याबरोबरच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली .नगरसेविकेच्या मागणीनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्याच वेळी शिवसेना नगरसेविका मीना गायके यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांचा रस्ता अडवला आणि सरळ भिंतीवर डोकं आपटून घेतलं.

 AM News Developed by Kalavati Technologies