दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी, दोघांना औरंगाबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

...असा रचला कट

औरंगाबाद । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीच्या नावाखाली कॉग्रेसचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र उर्फ बाळासाहेब संचेती यांना दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांनी बेड्य ठोकल्या. अजयसिंह राजपूत (रा.परदेशी गल्ली) व राजु बागुल (रा. रोटेगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायाधिश एस. आर. शिंदे यांनी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेबाबतची अधिक माहिती अशी कि आरोपी अजयसिंह राजपूत याचे शहरातील लक्ष्मी सिनेमागृहासमोर मोबाईलचे दुकान आहे. रोटेगाव येथील राजु बागुल हा त्याचा मित्र असुन त्या दोघांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी एक शक्कल लढवली. शहरातील नामवंत आसामी बाळासाहेब संचेती यांच्याकडून दहा कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी त्यांनी मागील दोन महिन्यांपासुन व्युहरचना आखली.

त्यासाठी त्यांनी वापरात नसलेला मोबाईल व मृत व्यक्तीच्या नावावरील सीम कार्ड वापरुन तपास यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. या मोबाईलवरुन त्यांनी बाळासाहेब संचेती यांना दहा कोटीची खंडणी मागण्यासाठी व्हाईस मँसेज पाठवला. त्यांनी पुतणे विशाल संचेती यांना हा मँसेज पाठवला. विशाल संचेती यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. या घटनेचा छडा लावण्यासाठी मागील चार दिवसांपासुन स्थानिक पोलिस व औरंगाबाद येथील गुन्हे शाखेचे पथक कार्यरत झाले होते. पोलिसांनी तपास करत मूख्य आरोपी अजयसिंह राजपूत व त्याचा साथीदार राजु बागुल यांना अटक केली. दरम्यान या प्रकरणी विशाल संचेती यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्व वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी करत आहेत.

असा रचला कट

झटपट श्रीमंत होण्यासाठी शहरातील लक्ष्मी थिएटर परिसरातील मोबाईल दुकान चालक अजयसिंह राजपूत (२९) व त्याचा साथीदार राजु बागुल यांनी मागील दोन महिन्यांपासुन योजना आखली होती. या योजनेत त्यांनी वापरात नसलेला मोबाईल व मृत व्यक्तीच्या नावावरील मोबाईल सीम कार्डचा वापर करण्याचे ठरवले. त्यासाठी गुन्हेगारी वर्तुळात खंडणी वसुल करण्यासाठी कसे संभाषण केले जाते याचा अभ्यास करुन सराव केला. त्यानंतर संचेती कुटुंबियांना मोबाईलवरुन तीन वेळा दहा कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली.AM News Developed by Kalavati Technologies