औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार, 1680 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

एमजीपी व एएमसीने तयार केला डीपीआर

औरंगाबाद ।  शहरातील पाणी पुरवठा प्रश्न सोडविण्यासाठी नगर विकास विभागाने 1680 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. 2052 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ही योजना तयार करण्यात आलीय. जायकवाडीत 46 मीटर आता जाऊन पाणी घेणार आहे.. जायकवाडीतुन 5 पाईप लाईन शहरात येणार आहेत. शहरात 27 पाण्याच्या टाक्या होत्या, योजनेच्या माध्यमातून नवीन 52 ठिकाणी टाक्या उभारणार, शहरात 1100 किमी पाईप लाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies