चिंता वाढली! अखेर 'बर्ड फ्लू'ची महाराष्ट्रात एंट्री, परभणीत 800 कोंबड्या दगावल्या

कोरोनानंतर आता राज्यासमोर बर्ड फ्लूचं संकट आले असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

परभणी । देशात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, राज्यस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. परभणीतील मुरंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा अहवाल समोर आला असून, बर्ड फ्लूमुळेच ह्या कोंबड्या दगावल्याचं स्पष्ट झालं आहे. मुरंबातील एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत पावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

एकाच गावात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने, खबरदारी म्हणून प्रशासनाने मुरंबा गाव तसेच परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिकांना बाहेर पडण्यात मज्जाव करण्यात आला असून, प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली आहे. दरम्यान, बीडमधील पाटोदा तालुक्यातील मुगाव या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली मृत कावळे सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत कावळ्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवल्यात आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पशुवैद्यकीय विभागाने गावास भेट देऊन मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविल्याची माहिती मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies