कोकनगा येथे खंडोबा यात्रा, चंपाषष्टी निमीत्ताने पालखी व काठी मिरवणुक

यात्रेची सांगता अहमदपूर येथील व्यापारी प्रमोद पोकर्णा यांच्यावतीने दिलेल्या महाप्रसादाने करण्यात आली

लातूर । अहमदपूर तालुक्यातील कोकणगा येथे जेजुरी अवतार श्री खंडोबा यात्रा व चंपाषष्टी निमित्ताने पालखी व काठी मिरवणुकीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात काठी व पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत पंचक्रोशीतील असंख्य भाविक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या गावात ही परंपरा पेशवाई काळापासून असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या यात्रेची सांगता अहमदपूर येथील व्यापारी प्रमोद पोकर्णा यांच्यावतीने दिलेल्या महाप्रसादाने करण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies