महाराष्ट्रात कोरोनामुळे चौथा बळी, वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू

24 मार्चला या महिलेचा मृत्यू झालेला होता. दरम्यान आज शवविच्छेदन अहवाल हाती आला

मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. यासोतबच आता मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दुसरीकडे आज कोरोनाबाधीतांची संख्या 124 झाली आहे.

24 मार्चला या महिलेचा मृत्यू झालेला होता. दरम्यान आज शवविच्छेदन अहवाल हाती आला. यावेळी हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies