93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला

उस्मानाबादवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे

औरंगाबाद | 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यंदाचे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला घेण्यात येणार असल्याची घोषणा औरंगाबादमध्ये करण्यात आली. कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जानेवारी महिन्यात संमेलन घेण्याचे निश्चित केले असून तारीख मात्र लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी गेल्या आठ वर्षांपासून केली जात होती. आता अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. यंदाचे साहित्यसंमेलन हे उस्मानाबादेच असणार आहे. मराठवाड्यात संमेलन घेण्यासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणांवर विचार करण्यात आला होता. मात्र उस्मानाबादवर शिक्कामोर्तब करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies