भोकरदनमध्ये विषबाधा होऊन 100 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

शासकीय अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाही, शासकीय मदतीची मेंढपाळाची मागणी

जालना । मेंढपाळाच्या शेकडो मेंढ्या शेतात चरत शहराजवळ येत असताना अज्ञात विषारी पदार्थ खाण्यात आल्याने काही मेंढ्या चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडू लागल्या व काही वेळातच मृत्यू झाला. जवळपास शंभरच्या आसपास मेंढ्यांच्या आतापर्यंत मृत्यू झाला असून अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ असून त्या बचावण्याची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वर बारकू शिंगाडे रा. कासारी ता. नांदगाव जि. नाशिक असे मेंढपाळाचे नाव असून मेंढ्या शेतात बसवून शेतीला खत मिळते, त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. त्यांच्याकडे शेकडो मेंढ्या असून काल दि. 2 सोमवार रोजी बरंजळा लोखंडे येथून मेंढ्या घेऊन भोकरदन शहराजवळ येत असताना नांजा पाटीजवळ काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन खाली पडल्या व मृत्यू झाला आहे. संध्याकाळी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ असलेल्या मेंढ्यावर उपचार केले. मात्र काही वेळाने त्यांच्या मृत्यू झाला. यावेळी 20 मेंढ्या मृत्यू झाल्या होत्या. दरम्यान मेंढ्या दगावण्याचे सत्र सुरूच असून आज संध्याकाळ पर्यंत शंभरच्या आसपास मेंढ्या चा मृत्यू झाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

शासकीय अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाही, शासकीय मदतीची मेंढपाळाची मागणी

घटनास्थळी अजूनही मेंढ्या दगावत असून कालपासून आजपर्यंत एकाही शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी सांगितले. तसेच मेंढपाळाचे जवळपास दहा लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज असून मृत्य मेंढ्यांचे 100 पिल्ले असून त्यांना जगवायचे कसे असा ही प्रश्न त्यांचे पुढे आहे या मेंढ्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मेंढपाळ शिंगाडे यांनी केली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies