..;तर काँग्रेसला 'उपमुख्यमंत्री' पद द्या, माणिकराव ठाकरेंची मागणी

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे

मुंबई । काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला आहे. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच आता काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळावं असं वक्तव्य काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यामध्ये सरकार सर्वांसाठी समान आहे, आणि सर्वांना एकत्र म्हणून चालायचं असेल तर, तर उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला द्यावं. सत्तास्थापनासाठी जेव्हा तीन पक्ष एकत्र आले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे देण्याचं ठरलं होतं. मात्र शेवटी उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्यात आलं. व विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला दिलं गेलं. त्यामुळे आता तरी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वक्तव्य माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies