Corona Update: औरंगाबादेत आज 314 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 28 हजारांचा टप्पा

जिल्ह्यात सध्या 5 हजार 753 रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे 21 हजार 813 जणांनी कोरोनावर मात केली आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज पुन्हा जिल्ह्यात 314 कोरोनाबाधितांची भर पडली तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 28 हजार 375 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 753 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे सुमारे 809 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे 21 हजार 813 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 22, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 62 आणि ग्रामीण भागात 60 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (161)

नागमठाण, वैजापूर (1), जारूळ, वैजापूर (1), गावंडी गल्ली, वैजापूर (1), जीवनगंगा, वैजापूर (2), संभाजी नगर, वैजापूर (1), बिडकीन (1), विहामांडवा, पैठण (1), वडगाव को. (1), घाटनांद्रा, सिल्लोड (1), बजाज नगर (2), टाकळी सागज (16), कनक सागज (2), पालखेड, वैजापूर (1), नमन विहार, एएस क्लब जवळ (1), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (2), दत्त नगर, रांजणगाव (1), रांजणगाव (1), वाळूज (2), अहिल्या होळकर नगर, घानेगाव (2), स्वामी समर्थ नगर, रांजणगाव (1), तालवाडा लोणी (1), शिऊर खालचा पाडा (1), हिलालपूर, शिऊर (1), वाकला लोणी (3), संत नगर, पैठण (3), नाथ विहार, पैठण (5), हमालगल्ली, पैठण (1), साखर कारखाना, मुद्दलवाडी (1), पिंपळवाडी, पैठण (1), पातेगाव, पैठण (1), भवानी नगर, पैठण (2), कापड मंडी, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (2), नाथ गल्ली, पैठण (1), तार गल्ली, पैठण (1), नारळा, पैठण (1), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), दहेगाव बंगला, गंगापूर (4), कायगाव, गंगापूर (1), बोळेगाव, गंगापूर (2), काटकर गल्ली, गंगापूर (1), लासूर नाका, गंगापूर (1), लासूर स्टेशन, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (1), मोढा बु. सिल्लोड (1), आमठाण, सिल्लोड (2), वीरगाव, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (1), वानवाडी, वैजापूर (1), धरणग्रस्त नगर, वैजापूर (1), लाडवाणी गल्ली, वैजापूर (1), टिळक रोड, वैजापूर (1), डवला, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (2), दहेगाव, वैजापूर (1) वाकला, वैजापूर (1), दौलताबाद (1), गंगापूर (1), डिगर, कन्नड (1), रांजणगाव, शेणपूजी (1) आनंद खेडा (1), खुलताबाद (1), औरंगाबाद (19), कन्नड (6), वैजापूर (21), पैठण (16)

मनपा (69)

दिशा नगरी, बीड बायपास (2), घाटी परिसर (1), श्रीनिकेतन कॉलनी, जालना रोड (1), चुना भट्टी, गांधी नगर (1), नारायणी अपार्टमेंट, ज्योती नगर (1), खडकेश्वर (2), जाधववाडी (1), गारखेडा परिसर (1), दर्गा रोड (1), उल्कानगरी (1), विष्णू नगर (1), सातारा गाव (4), भावसिंगपुरा (2), सातारा परिसर (3), विशाल नगर (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), बीड बायपास (2), शिवशंकर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), गुरूदत्त नगर (1), मित्रानगर (2), उत्तम नगर (2), गजानन कॉलनी (2), विश्रांती नगर (1), विवेकानंद नगर, एन चार सिडको (1), पारिजात नगर (1), बालाजी नगर (1), मयूर पार्क (3), सारा परिवर्तन, सावंगी (1), न्यू गणेश नगर, गारखेडा परिसर (1), महालक्ष्मी नगर (1), पद्मपुरा, मामा चौक (1), बौद्ध नगर (1), शिवाजी नगर (1), रेणुका माता मंदिर परिसर, जळगाव रोड (1), मनजित नगर (1), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (1), लोटा कारंजा परिसर (1), समृद्धी नगर (1), उस्मानपुरा (1), मुकुंदवाडी (1), मोतीवाला नगर (1), खिवंसरा पार्क (1), कोमल नगर, पडेगाव (1), हनुमान नगर (2), महेश नगर (2), एन तेरा हडको (2), अन्य (1), जय भवानी नगर (1), देवळी चौक (1), भारत माता नगर (1), विजय नगर (1), एन पाच सिडको (1),

सिटी एंट्री पॉइंट (22)


एन नऊ सिडको (1), जाधववाडी (1), पिसादेवी (1), हर्सुल (2), पडेगाव (4), वेदांत नगर (1), नागेश्वरवाडी (2), चिकलठाणा (1), नक्षत्रवाडी (1), वडगाव (3), बजाज नगर (5)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीमध्ये नवजीवन कॉलनीतील 74, भवानी नगरातील 60, कन्नड तालुक्यातील नागद येथील 58, टेक नगर, सिल्लोड येथील 62, सैनिक कॉलनी, पडेगावातील 70, एन आठ, सिडकोतील 68 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies