प्रसिद्ध संगितकार जोडगोळी साजिद-वाजिद यांच्यातील वाजित खान यांचे निधन

काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचे निधान झाले होते.

मुंबई | बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचे निधान झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला आहे.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारावर ते मात करु शकले नाही. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूडने एक उत्तम सगीतकार गमावला आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.AM News Developed by Kalavati Technologies