सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमाचा मन हेलावून टाकणारा टीझर भेटीला

...त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार

मुंबई । माय माऊली हिरकणीची आपल्या बाळासाठी असलेली ओढ आणि केवळ आपल्या बाळासाठी गडाची कडा उतरण्याची जोखीम उचलणा-या ‘हिरकणी’ची झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
मराठी अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. टीझर मध्ये सोनाली कुलकर्णीचे धाडसी रूप दिसून येत. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे. अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिरकणी’चे पोस्टर पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले होते.

शिवाजी महाराजांच्या रायगडाचे गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या घरी असलेल्या बळासाठी हिरकणी गडाच्या एका बुरूजावरून खाली उतरली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव ठेवले.AM News Developed by Kalavati Technologies