कुटुंबीयांना धमकी, अनुराग कश्यपने टि्वटरचा केला त्याग

भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल - अनुराग कश्यप

नवी दिल्ली । हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या बेधडकपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते चित्रपटांशिवाय कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मुद्द्यावर बिनधास्तपणे आपले मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अनुराग कश्यप यांनी आता टि्वटर सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन, मॅसेज येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येऊ लागतात आणि तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा.

सोशल मिडीयावर सक्रिय असणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना आणि त्यांच्या मुलीला धमकीचे फोन, मेल आणि मेसेजेस नेटकऱ्यांकडून येत असल्याने ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयावर अनुराग यांनी ट्विट केले होते. त्यात मोदी सरकारने कश्मीरबद्दल घेतलेल्या निर्णयावर आपली द्विधा मनस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाची भिती वाटते. कलम 370 आणि कलम 35 अ याबाबतीत जास्त काही बोलू शकत नाही. कारण त्याचा इतिहास आणि तथ्य मी समजू शकत नाही. असेही त्यांनी म्हटले होते.AM News Developed by Kalavati Technologies