ThisIs83 : लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांचा फर्स्ट लुक

चित्रपटातील कपिल देवचा लूक यापूर्वी रिलीज झाला आहे. खुद्द कपिल देव यांनीही रणवीरच्या लूकचे कौतुक केले.

नवी दिल्ली ।  दिग्दर्शक कबीर खानच्या चित्रपट ThisIs83 मधील सुनील गावस्करच्या लूकमध्ये अभिनेता ताहिर राज भसीनचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी कपिल देवच्या भूमिकेत असलेला अभिनेता रणवीर सिंगचा लूक चित्रपटात प्रदर्शित झाला होता. दोघेही कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार परफेक्ट दिसत आहेत.

इंस्टाग्रामवर सुनील गावस्करचा लूक शेअर करताना कबीर खानने लिहिले की, 'विश्वचषकात प्रवेश करताना वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांना फक्त या एका प्लेअरची भीती वाटत होती. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासारखा लुक ठेवण्याचा निर्मात्यांनी पुरेपुर प्रयत्न केला आहे.

रणवीर सिंग चित्रपटामध्ये कपिल देव सारखाच दिसत आहे. या चित्रपटातील कपिल देवचा लूक यापूर्वी रिलीज झाला आहे. खुद्द कपिल देव यांनीही रणवीरच्या लूकचे कौतुक केले. कबीर खान दिग्दर्शित ThisIs83 क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे.AM News Developed by Kalavati Technologies