तान्हाजी चित्रपट मराठीत येणार; 10 जानेवारीला चित्रपटगृहात झळकणार

तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित

मुंबई । ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी:द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात अजय देवगणसह काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती सूभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. हा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठीतही असावा अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिने अभ्यासविश्लेषक तरण आदर्शने ट्वीटकरत ही माहिती सगळ्यांना दिली. दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठीत प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies