'नाळ' चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची 'ही' आहे यादी

नवी दिल्ली । दिल्लीच्या शास्त्री भवन येथे शुक्रवारी 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात 'नाळ' चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून अंधाधूनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 'उरी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मराठीसह अन्य भाषांमधील चित्रपटांनाही पुरस्कार यावेळी जाहीर झाले. तत्पूर्वी पुरस्कार निवड समितीमधील सदस्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अंतिम निकालाची यादी सुपूर्द केली.

गतवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. ‘नाळ’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ’ याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या(चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात या पुरस्कारांची घोषणा होते. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी :

सर्वोत्कृष्ट चित्रपट- हेल्लारो (गुजराती)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंदाधुंद
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुषमान खुराना (अंदाधुंद), विकी कौशल (उरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्थी सुरेश (महंती)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे, पी.व्ही. रोहित, साहिब सिंग, तल्हा अर्शद रेशी

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग- उरी
सर्वोत्कृष्ट संकलन- नतिचरामी (कानडी)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनिंग- कामरा संभवम (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट वेशभुषा- महंती (तेलुगू)

 सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट- पद्मन
 सर्वोत्कृष्ट चित्रपट (पर्यावरण संवर्धन)- पाणी
 सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित)- अंदाधुंद
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - ची ला सो
 

सर्वोत्कृष्ट संवाद- तारीख (बंगाली)

सर्वोत्कृष्ट रंगभूषा- आव (तेलुगू)
 सर्वोत्कृष्ट संगीतकार- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
 

सर्वोत्कृष्ट गीतकार- नतिचरामी (कानडी)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस- आव (तेलुगू) केजीएफ (कानडी)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य- केजीएफ

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरजित सिंग (बिंते दिल)
सर्वोत्कृष्ट लघुपट- खरवस
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन) - सुधाकर रेड्डी यंकट्टी (नाल)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई होAM News Developed by Kalavati Technologies