लंडनवरुन परतली सोनम कपूर, स्वतःला केलं घरात बंद

सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय

मुंबई | कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आता सर्वांनीच घराबाहेर पडणं बंद केलं आहे. सरकारनेही शाळांना सुट्या दिल्या आहेत. सर्वसामान्यांपासून तर सेलिब्रेटींपर्यंत सर्वच या व्हायरसपासून खबरदारी घेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही नुकतीच लंडनवरुन भारतात परतली. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यात सोनमने विमानात असताना तोंडाला मास्क लावलेली दिसत आहे.

View this post on Instagram

Stay safe guys♥️ @sonamkapoor . . . #sonamkapoor // #corona #coronavirus #covid_19

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoorpedia) on

तसेच सोनमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये बोलताना दिसतेय. ती म्हणतेय की, 'मी माझ्या पतीसोबत भारतात येत आहे. घरी जाण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.' मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर तिने भारत सरकारने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी करण्यात आलेल्या सोयींचं कौतुक केले आहे. भारतातील सर्व विमानतळांवर परदेशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाचं स्क्रीनिंग केलं जात आहे. प्रवाशाला कोरोना व्हायरसची लागण झाली की नाही हे तपासूनच त्याला घरी सोडले जात आहे.

सोनम कपूर व्हिडिओमध्ये म्हणतेय की, विमानतळावर तिचे अनेक वेळा स्क्रीनिंग करण्यात आले. आता घरी पोहोचल्यानंतर सोनम घरच्यांसोबतच आहे. तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अनेकजण या व्हायरसपासून वाचण्यासाठी घरात राहत आहेत. तसेच गर्दी असेल अशा ठिकाणी जाणंही टाळत आहेत. यामध्ये सोनमनेही सर्वांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram
View this post on Instagram

Stay safe guys♥️ @sonamkapoor . . . #sonamkapoor // #corona #coronavirus #covid_19

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoorpedia) on

Love you too Queen !❤️ @sonamkapoor via her insta stories ✨ // #sonamkapoor

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoorpedia) onAM News Developed by Kalavati Technologies