श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीने केला मुलीचा विनयभंग, तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अभिनवने सावत्र मुलगी पलकला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

मुंबई | अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचा दुसरा पती अभिनव कोहलीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. त्याने तिची पहिल्या पतिची मुलगी पलकचा विनयभंग केल्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप अभिनववर लावला आहे. श्वेताने तक्रार दाखल केल्यानंतर अभिनव कोहलीला पोलिसांनी गजाआड केले आहे. अभिनव हा कायम दारुच्या नशेत असतो. तसेच नशेत असताना त्याने 18 वर्षीय सावत्र मुलगी पलकला शिवीगाळ केली तसेच तिला मारहाण केली. असा आरोप श्वेता तिवारीने लावले आहेत. रविवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अभिनवला मुंबईतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. दरम्यान पोलिसांनी श्वेता-पलकच्या उपस्थितीत त्याची चार तास चौकशी केली. यानंतर पोलिसांनी श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनवविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.

पलक ही श्वेता तिवारीच्या पहिल्या पतिची मुलगी आहे. श्वेता यानंतर दुसरे लग्न अभिनव कोहलीसोबत केले. मात्र अभिनवने सावत्र मुलगी पलकला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. श्वेताच्या आरोपांनुसार अभिनव माझ्या आणि पलकसोबत नेहमी गैरवर्तणूक करत असतो. यासोबतच अभिनवने पलकला त्याच्या मोबाईलमध्ये एका मॉडेलचा अश्लील फोटोही दाखवला होता. मात्र त्याने पलकवर हात उचलला आणि आता पाणी डोक्यावरुन गेले आहे. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याशिवाय पर्याय नव्हता असे श्वेता तिवारी म्हणाली.

श्वेता तिवारीच दुसऱ्यांदा कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली आहे. तिने पहिले राजा चौधरीबरोबर केले होते. मात्र पहिला पती राजा चौधरीही दारुच्या नशेत तिला मारहाण करायचा. त्यामुळेच तिने राजासोबत 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटानंतर पलक आई श्वेतासोबतच राहते होती. यानंतर श्वेताने अभिनव कोहली सोबत लग्न केले. 'जाने क्या बात है' नावाच्या मालिकेत अभिनव आणि श्वेताने एकत्र काम केलं होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनी 13 जुलै 2013 रोजी लग्न केले. यानंतर त्यांना रेयांश हा मुलगाही आहे. मात्र अभिनव आणि श्वेतामध्ये मागील एका वर्षापासून आलबेल नसल्याचे वृत्त होते. मीडियामध्ये हे वृत्त आलेही होते. मात्र त्या दोघांनी याविषयी काहीच वाच्यता केली नव्हती. मात्र आता हे सर्व प्रकरण समोर आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies