लॉक़डाऊनमध्ये अक्षय कुमार सेटवर, केंद्र सरकारच्या जाहिरातीचं शुटींग

मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये शुटींग

मुंबई | अभिनेता अक्षय कुमारचे चित्रिकरण करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दोन महिन्याच्या ब्रेकनंतर चित्रिकरणासाठी सेटवर आलेला तो पहिला अभिनेता आहे. खंरतर अक्षय कुमारने या जागतिक संकटात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मग अक्षय कसा काय लॉकडाऊनच्या काळात चित्रिकरण करतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणं सहाजिकच आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे एक जाहिरातीचं शुटींग असून ही जाहिरात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी चित्रीत करण्यात येत आहे. हे चित्रिकरण सुरू असताना सगळ्यांनी मास्क घातलं होतं. त्याचबरोबर सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकरोपणे पालन करण्यात आलं..या जाहिरातीचं दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केलं असून मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओमध्ये याचं चित्रिकरण करण्यात आलं.AM News Developed by Kalavati Technologies