'जर्सी'च्या रिमेकमध्ये शाहिद कपूरचे कोच बनणार पंकज कपूर, 5 वर्षांनंतर एकत्र दिसणार पितापुत्र

पुढच्या वर्षी 28 ऑगस्ट 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई | तेलुगु चित्रपट 'जर्सी'चा हिंदी रिमेक केला जात आहे. यामध्ये शाहिद कपूर, मृणाल ठाकुर काम करत आहेत. आता पंकज कपूरही या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंकज या चित्रपटामध्ये शाहीद कपूरच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये 'शानदार' चित्रपटात त्यांची जोडी दिसली होती. तर 2011 मध्ये 'मौसम' ला पंकज यांनी दिग्दर्शित केले होते.

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी करत आहे. त्यांनी तेलुगु सिनेमाचेही दिग्दर्शन केले होते. चंडीगढमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. तर पुढच्या वर्षी 28 ऑगस्ट 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्पोर्ट्सवर आधारित असलेला हा सिनेमा भारतीय क्रिडा दिवसाच्या बरोबर एक दिवसपूर्वीच रिलीज होऊ शकतो.

पंकज कपूर 2015 मध्ये 'शानदार' चित्रपटात दिसले होते. यानंतर वेब प्लॅटफॉर्मवर 'टोबा टेक सिंह' मध्ये ते झळकले होते. आता 5 वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांचा 'जर्सी' हा चित्रपट येत आहे. याच काळात त्यांनी लिहिलेल्या कादंबरीचेही प्रकाशन झाले होते. या कादंबरीचे नाव 'दोपरही' आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी 27 वर्षांचा काळ लागल्याचे पंकज कपूर म्हणाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies