सिनेसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच निधन

300 हून अधिक सिनेमात साकारल्या विविध भूमिका

मुंबई । ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, 300 हून अधिक सिनेमात साकारल्या विविध भूमिका. गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानं एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेंनी लहान लहान भूमिकादेखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या.

त्यांती अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्टची भूमिकाही गाजली. तसेच अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटात अतिशय छोटी भूमिका असूनही ती प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11वाजण्याच्या सुमार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies