कँसरमुक्त होऊन 1 वर्षानंतर मुंबईत परतले ऋषी कपूर, पत्नी नीतूही दिसल्या सोबत

सोमवारी ऋषी कपूर कँसरमुक्त होऊन भारतात परतले आहे.

मुंबई | बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेण्यासाठी गेले होते. जवळपास 1 वर्षानंतर ते न्यूयॉर्कमधून भारतात परतले आहेत. हा काळ ऋषी कपूर यांच्यासाठी खूप अडचणीचा होता. मात्र त्यांना या सर्व गोष्टींचा सामना केल्या. सोमवारी ऋषी कपूर कँसरमुक्त होऊन भारतात परतले आहे. मुंबई एअरपोर्टवर ऋषी कपूर आणि त्यांच्या पत्नी नीतू कपूर स्पॉट झाल्या.

ऋषी कपूर जवळपास 1 वर्षांनंतर भारतात परतले आहे. दीर्घकाळापासून ते मुंबईमध्ये येण्याची प्रतिक्षा करत होते. आपले घर आणि देशाला ते खूप मिस करत होते. मुंबईमध्ये परतून ते खूप आनंदी आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे एअरपोर्टवर खूप आनंदी दिसत होते. ऋषी कपूर यावेळी कॅज्यूअल लूकमध्ये दिसले. तर नीतू कपूर ब्लॅक टॉप, डोनिम जीन्स आणि ब्लॅक श्रगमध्ये दिसल्या. ऋषी-नीतू भारतात परतल्यानंतर त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी रिद्धा कपूरने इंस्टा स्टोरी टाकत ऋषी कपूर भारतात परतत असल्याची माहिती दिली होती.

ऋषी कपूर यांना त्यांच्या आजारपणात कुटुंब, मित्र आणि बॉलिवूड सेलेब्सचा खूप सपोर्ट मिळाला. न्यूयॉर्कमध्ये सेलेब्स अॅक्टर नेहमी भेटत होते. पतीच्या आजारपणात नीतू कपूर नेहमी ऋषी कपूर यांच्यासोबत होत्या. या काळात त्या एकदाही भारतात आल्या नाहीत.AM News Developed by Kalavati Technologies