प्रसिध्द गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या घरी लवकरच होणार पाहूण्याचं आगमन

नेहा कक्करनं एक इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत ‘खयाल रखया कर’ असं कॅप्शन दिलं आहे.

मुंबई | दोन महिन्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रसिध्द गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहसोबत लग्नाच्या बंधनात अडकली आहे. यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले नाहीत की नेहा आणि रोहनप्रीतसोबत चे एक फोटो शेअर केला आहे. फोटो बघून नेहा आणि रोहनच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन होणार असं दिसतंय. मात्र दोघांनीही फोटो शेअर करताना याचा उल्लेख केलेला नाही.

नेहा कक्करनं एक इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत ‘खयाल रखया कर’ असं कॅप्शन दिलं आहे. त्या फोटाला प्रतिक्रिया देत रोहनप्रीतनं ‘आता तर जास्त काळजी घ्यावी लागणार’अशी कमेंट केली आहे. नेहाच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर काहींना नेहा खरच गर्भवती आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. खुप कमी वेळात या फोटो व्हायरल झाला आहे.

दरम्यान नेहा कक्करच फोटोचे कॅप्शन पाहता, नेहाच्या आगामी गाण्याचा पब्लिसिटी स्टंट असु शकतं असा अंदाजा वर्तवण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies