पाहा 'शेवंता'ने नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन, तुम्ही हक्क बजावला का?

लोकशाहीतील सर्वांत मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा हक्का सर्व लोक बजावत आहेत.

पुणे | महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यातील 288 जागांसाठी मतदान सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून राजकीय नेत्यांकडून प्रचास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्वच उमेदवार मतांचा जोगवा मागत फिरत होते. आज मतदारराजाची वेळ आहे. आपले सरकार निवडण्यासाठी मतदारांनी आपले मत देण्याचा आज दिवस आहे. सकाळपासून राज्यात मतदान होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय नेत्यांसोबतच कलाकारांनीही आपले मत नोंदवले आहे. मतदान हा फक्त आपला हक्क नसून हे एक कर्तव्य आहे. यामुळे मतदान नक्की करा असे आवाहन कलाकारांकडून करण्यात येत आहे.

लोकशाहीतील सर्वांत मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा हक्का सर्व लोक बजावत आहेत. यामध्ये मराठी सेलिब्रिटी मागे नाहीत. पुणे, मुंबईतील मराठी सेलिब्रिटिंनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच सेलिब्रिटींकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही केलंय. यात महाराष्ट्राची लाडकी शेवंता अर्थात अपूर्वी नेमळेकर हिनं व्हिडिओद्वारे मतदारांना आवाहन केलयं.

यासोबतच हिरकणी सिनेमात लीड रोल करत असलेल्या सोनाली कुलकर्णीनेही मतदारांना आवाहन केलंय.AM News Developed by Kalavati Technologies