पाकिस्तानी कलाकार-चित्रपट निर्माते-संगीतकार यांच्यावर पूर्णपणे बंदी घालावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

पाकिस्तानी कलाकार-चित्रपट निर्माते-संगीतकार यांच्यावर पूर्णपणे बंदी घालावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला. तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस असेल किंवा भारतीय चित्रपटांवरील बंदी असेल असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटने देखील पाकिस्तानी कलाकार, चित्रपट निर्माते, संगीतकार यांच्यावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तसेच पाकिस्तानबरोबरचे राजनितीज्ञ आणि द्विपक्षीय संबंध देखील संपूष्टात आणले जावे अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना संघटनेकडून पत्र पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, याखेरीज पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय इम्रान खान सरकारने घेतला आहे. इम्रान खान यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या साहाय्यक डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले की, भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही भारताशी व्यापारी संबंध व सांस्कृतिक संबंध बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे धोरण आम्ही आखत आहोत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी शुक्रवारी चीनला रवाना झाले आहेत. भारत असंवैधानिक मार्गाने प्रादेशिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे ते चीनला जाण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या भारताच्या निर्णयावर चीनसोबत चर्चा करण्यासाठी महमूद कुरेशी चीनला रवाना झाले आहेत. चीन केवळ पाकिस्तानचा मित्र नाही तर आशियातील महत्वाचा देश आहे. भारताने मानवधिकारीचे उल्लघंन केल्याची माहिती चीनला देऊ, असे ते म्हणाले. दरम्यान लडाखमध्ये भारताने केलेल्या बदलांचा चीनने देखील विरोध केला आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानने आदळआपट सुरू केली आहे. भारतासोबतचे परराष्ट्र संबंध तडकाफडकी तोडले असून भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांनाही परत पाठवले आहे.AM News Developed by Kalavati Technologies