कोल्हापुरातील महापुराचा फटका तुझ्यात जीव रंगलाच्या टीमलाही

राणादा अडकला पुराच्या पाण्यात

कोल्हापूर । कोल्हापुरातील महापुराचा फटका आता अंजली आणि राणा ला सुद्धा बसला आहे. नागाळा पार्क येथील अपारमेंटमध्ये 'तुझ्यात जीव रंगला' ची टीम राहत आहे. पण तेथील परिसरातील अनेक आपारमेंटमध्ये पाणी शिरल्याने त्यांना तिथून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी अंजली आणि राणा सुद्धा गुडघ्या पेक्षा जास्त पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळालं. रानादा आणि त्याच्यासोबत अंजली आणि सर्वच कलाकार पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना पाहायला मिळाले. कोल्हापुरातील वसगडे या गावी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. यातील सर्वच कलाकार कोल्हापूरमध्ये वास्तव्यास आहेत. या सर्व कलाकारांना महापुराचा फटका बसला असल्याचे पाहायला मिळाले.AM News Developed by Kalavati Technologies