इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी शिल्पा शेट्टीच्या पतीची चौकशी सुरू

राज कुंद्रा ईडी कार्यालायत असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा हस्तक इकबाल मिर्ची याच्या सर्व संपत्तीवर ईडीने टाच आणत चौकशी सुरू केलेली आहे. यामध्ये अनेक नावे पुढे येत असून त्यांनीसुद्धा चौकशी ईडी करत आहे. वरळीतल्या सिजे हाऊस संदर्भांत ईडीने राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर मिर्ची चा हस्तक हुमायू मर्चंट ला सुध्दा बेड्या ठोकल्या आहेत. इकबाल मिर्चीचा साथीदार रणजित बिंद्रा कडून 2011 साली प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. या व्यवहारात आता ईडीने लक्ष घातले आहे. कुंद्रा आणि बिंद्रा यांच्यात ही डिल कशी झाली आणि पैश्यांचे व्यवहार कसे झाले होते यासाठी ईडीकडून आता कुंद्राची चौकशी होत आहे. राज कुंद्रा ईडी कार्यालायत असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी बॅलार्ड पियर येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात उद्योगपती राज कुंद्राची चौकशी सुरू आहे. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हजर ते कार्यालयात हजर झाले. कुंद्रा यांची ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या चौकशीनंतर आता कुंद्रा यांची ईडी चौकशी केली जात आहे.

इकबाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला समन्स बजावण्यात आला होते. राज कुंद्राला चौकशीसाठी 4 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आजच कुंद्रा यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्यामुळे राज कुंद्रा यांच्या ईडी चौकशीत काय उघड होणार हे महत्त्वाचं ठरणारAM News Developed by Kalavati Technologies