नाट्यगृहात एसी बंद भरत जाधव संतापले! ठाणे महानगर प्रशासनाला आली जाग

यापुढे ठाण्यात कलाकारांना त्रास होणार नाही, नरेश म्हस्केंच आश्वासन

ठाणे । ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाबाबत अभिनेता भरत जाधव यांनी फेसबुकद्वारे केलेल्या तक्रारी नंतर, ठाणे महानगर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. अभिनेता भरत जाधव यांच्या 'सही रे सही' या नाटकाच्या शो दरम्यान नाट्यगृहातील एसी बंद असल्याने कलाकारांना आणि प्रेकक्षकांना याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर भरत जाधव यांनी प्रशासनाकडे तक्रार करून देखील, एसी सुरु न केल्याने त्यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातुन आपली खंत व्यक्त केली. त्यानंतर आज पालिका प्रशासनाला जाग आली आणि महापालिका सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी नाट्यगृहाला भेट देत, सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवत याबाबत जाब विचारला, आणि भरत जाधव यांना जो त्रास झाला त्याबद्दल ठाणे महानगरपालिका तर्फे मी माफी मागतो, आम्ही कलाकारांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो, आम्ही आता पाहणी केलेली आहे, काल देखील भरत जाधव यांच्या नंतर प्रशांत दामले यांचा शो इथे झाला, पण त्यांची काही तक्रार नव्हती, कदाचित सेट आणण्यासाठी जो दरवाजा असतो तो उघडा असेल, इथे सिलिंगच काम सुरू आहे, त्यामुळे एसी थोडी कमी असेल, आता आम्ही पाहणी केली आहे, आणि जे काही मुद्दे असतील त्यावर तोडगा काढायला सांगितले आहे, यापुढे ठाण्यात कलाकारांना त्रास होणार नाही अस आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिल.AM News Developed by Kalavati Technologies