अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली? छगन भुजबळांचा सवाल

अक्षय कुमारचा खाजगी हेलिकॉप्टर दौरा वादात भोवऱ्यात

नाशिक । बॉलिवूड स्टार अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक दौरा हेलिकॉप्टरमुळे चांगलाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता अक्षय कुमार हा नाशिकच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये उपचारासाठी आला होता. त्यावेळी एका शिक्षण संस्थेच्या खाजगी हेलिपॅडवर अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर लँड करण्यात आले होते. मात्र या हेलिकॉप्टर दौऱ्याला परवानगी कशी मिळाली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सगळे मंत्री गाडीतुन फिरत असतांना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरसाठी परवानगी कशी मिळाली, असा सवाल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी सुरज मांढरे यांना विचारला आहे.
त्यावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही काहीच माहीत नसल्याचा धक्कादायक खुलासा चक्क पालकमंत्री भुजबळ यांच्यासमोर केल्याने आता हा हेलिकॉप्टर दौरा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शासकीय नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली कशी आणि ती कोणी दिली, याबद्दल भुजबळ देखील अनभिज्ञ असून पावसाच्या दिवसात येणं उचित नाही हे सांगताना चौकशीचे आदेश भुजबळांनी दिले आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांची हद्द असून सुद्धा शहर पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लवाजमा अक्षय कुमारच्या स्वागताला असल्याचं एका विडिओ आणि काही फोटोंमधून व्हायरल झालं आहे. त्यावरही भुजबळ यांनी लक्ष दिले असून ग्रामीण पोलिसांची हद्द सोडून पोलीस गेले याची माहिती घेऊन कारवाई करू, असही भुजबळ म्हणाले आहे.
तर दुसरीकडे अक्षय कुमारला सर्व अधिकृत माहिती संकलित केल्यानंतर परवानगी देण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र राज्य सरकारच्या विद्यमान मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह अनेक जेष्ठ मंत्री हे सुद्धा गाडीने फिरत असल्याने अभिनेता अक्षय कुमारला परवानगी नेमकी कोणी आणि का दिली ? याबाबत चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिल्याने हेलिकॉप्टरच्या गिरक्या वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे.AM News Developed by Kalavati Technologies