सुशील मुलाला डेट करावं, आई-वडिलांची इच्छा - सोनाक्षी सिन्हा

'बॉयफ्रेंडने धोका दिल्यास तो पुढचा दिवस पाहणार नाही'- सोनाक्षी सिन्हा

बॉलीवूडची एक मेहनती अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचा खानदानी शफाखाना हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या सोनाक्षी त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी दिसत आहे. सध्या तरी सिंगल असलेल्या सोनाक्षीने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिच्या पर्सनल लाईफविषयी एक मोठा खुलासा केला आहे.  सोनाक्षी सिन्हा आपल्या खासगी आयुष्याविषयी खूप कमी वेळा बोलते. तिच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी सुद्धा फारसं कोणाला काही माहित नाही. सोनाक्षीच्या 9 वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिच नावं अद्याप कोणत्याही सहकलाकाराशी जोडलं गेलेलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणे बोलली. याचवेळी तिनं तिच्या रिलेशनशिप बद्दलही सांगितलं. सोनाक्षी म्हणाली, ‘माझ्या आई-बाबांना वाटतं की, मी एका सुशील मुलाशी लग्न करावं आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असं कोणीही नाही. माझ्या भूतकाळात मी एका स्टार बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट केलं होतं आणि याबद्दल कोणाला काहीच समजलं नाही.’ पण यावेळी सोनाक्षीनं या अभिनेत्याचं नाव घेणं मात्र टाळलं.

सोनाक्षी तिचं नातं सर्वांसमोर उघड करत नसली तरीही तिला नात्यात विश्वासघात करणं अजिबात मान्य नाही. तुझा बॉयफ्रेंड तुझ्याशी चीटिंग करत असेल तर तु काय करशील? त्यावर ती म्हणाली, 'तो पुढचा दिवस पाहण्यासाठी जिवंत राहणार नाही.' यावरून ती रिलेशनशिपच्या बाबतीत खूपच शिस्तबद्ध आणि गंभीर असल्यांच दिसून येतं. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी बंटी सजदेहला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. यावर सोनाक्षीला विचारल्यावर तिनं या सर्व अफवा असल्याचं सांगत, 'जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना सांगेन. ही गोष्ट सर्वांपासून लपवण्यासारखी अजिबात नाही.'

सोनाक्षी पुढे म्हणाली, मी सध्या माझ्या कामात खूप बीझी आहे. त्यामुळे मी लग्नाचा विचार अद्याप केलेला नाही. पण मला समजत नाही लोक अशा अफवा कशा पसरवतात. आगामी सिनेमाबद्दल बोलायचं तर सोनाक्षी लवकरच खानदानी शफाखानामध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रॅप सिंगर बादशाह आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय ती सलमान खान सोबत दबंग 3 मध्येही दिसणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies