मराठमोळा फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदेने केला 'ट्रान्सवुमन' असल्याचा खुलासा

सोशल मिडियावर पोस्ट करत आपण ट्रान्सवुमनचा केला खुलासा

मुंबई | आपली ओळख नेमकी काय, ती मिळविण्यासाठी तिला थोड वेळ लागला. पण, जेव्हा त्याची अनुभूती झाली तेव्हा मात्र तिने आपल्या जीवनालाच कलाटणी देणारा एक निर्णय घेतला. हा निर्णय समाजाच्या दृष्टीने तेवढाच धाडसी ठरला, तर तो कलावविश्व आणि इतर अनेकांसाठी स्वागतार्हही ठरला. ट्रान्सवुमन होण्याचा तो निर्णय़ होता आणि तो बॉलिवूडमधील सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे याने घेतला आहे. आता ज्याची नवी ओळख ‘साईशा’ अशी असणार आहे.

दीपिका पदुकोण, किआरा अडवाणी, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रिटींसोबत काम करण्याचा अनुभव असणारा स्वप्नील शिंदे यापुढे ट्रान्सवुमन असणार आहे. आताच्या साईशाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जीवनातील या महत्त्वाच्या बदलाची माहिती सर्वांसमोर आणली. त्याचबरोबर आपल्या नावाचा अतिशय समर्पक अर्थही सर्वांपुढे मांडला. साईशा म्हणजेच अर्थपूर्ण आयुष्य तुमच्या बालपणीच्या काही आठवणी जागवणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात. 

साईशा होण्यापर्यंतचा स्वप्नील यांचा प्रवास येथेच थाबंला नव्हता. जीवनातील काही वर्षे आपण गे असल्याचे समजत तो पुरुषांकडे आकर्षित झाला. पण, सहा वर्षांपूर्वीच ही बाब त्याने स्वीकारली की, आपण गे पुरुष नसून एक ट्रान्सवुमन आहोत. हा बदल इतका सकारात्मक पद्धतीने स्वीकारला गेला की, शिंदे यांना आता त्यांचा स्टाफही ‘मॅम’ म्हणून संबोधत आहे, ते देखील अतिशय अभिमानाने. आपल्या जीवनातील या अतिशय मोठ्या बदलाची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली, तेव्हा सेलिब्रिटींपासून ते कला विश्वातील अनेक मित्रमंडळींकडून त्यांच्यावर या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा आणि या निर्णयासाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

अदिती राव हैदरी, सई ताम्हणकर, परिणीती चोप्रा, सनी लिओनी यांनी साईशा शिंदेचे या वर्तुळात मोठ्या आपलेपणाने स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.AM News Developed by Kalavati Technologies