राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीने बजावला समन्स

इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. 4 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा यांची चौकशी केली जाणार आहे. मात्र राज कुंद्रांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत राज कुंद्रांनी हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये भर पडल्याचे बोलले जात आहे. मात्र राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असताना ईडीला राज कुंद्रा यांच्या संबंधित माहिती मिळाली होती. कारण या पडताळणीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचे नाव समोर आलं. या कंपनीचे मालक राज कुंद्रा आहेत. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालिका आहे. दरम्यान 2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही नसल्याचं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies