CoronaVirus : अभिनेते दिलीप कुमारही आयसोलेशनमध्ये

पत्नी सायरा बानो यांनीही दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहे.

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या आरोग्याविषयी अनेकदा ते अपडेट देतात. यावेळीही त्यांनी आपल्या आरोग्याविषयी माहिती शेअर केली आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. भारतातही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनीही दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहे.

दिलीप कुमार यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे यापूर्वीही अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय पत्नी सायरा बानो यांनी घेतला. यामुळे करोनाचे विषाणू त्यांच्या जवळपास पोहोचणार नाहीत. या संदर्भात दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरुन ट्विट करण्यात आलं आहे. 'कोरोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.' दिलीप कुमार यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies