कोरोनामुळे चित्रपटांचे शूटिंग रद्द, दीपिका पदुकोण घरी बसून करतेय 'हे' काम

अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंगही सध्या पुढे ढकलण्यात आले आहे.

मुंबई | देशासोबत राज्यभरात कोरोना रुग्णांची संध्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान दैनंदिन जीवनावर हा कोरोना व्हायरसचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे. शाळा, कॉलेज, मॉल, चित्रपटगृह सर्वच येत्या 31 मार्चपर्यंत राज्य शासनाकडून बंद करण्यात आले आहे. तसेच गर्दी न करण्याचे अवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंगही सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असे निर्देश देण्यात आले आहे.

दरम्यान आता बॉलिवूडचे कलाकारही घरात बसून आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता अभिनेत्री दीपिका पदुकोणही घरात बसली आहे. पण तिने हा रिकामा वेळ चांगलाच सत्कारणी लावला आहे. दीपिकाने याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने वार्डरोबची स्वच्छता करताना फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, Productivity in the time of COVID-19!???? #cleaning #wardrobe कोरोनामुळे शूटींग, इव्हेंट रद्द करण्यात आले आहेत. बाहेर कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. दरम्यान अनेक कलाकारांनी घरात वेळ घालवण्याचा मार्ग पत्करला आहे.

View this post on Instagram

Productivity in the time of COVID-19!???? #cleaning #wardrobe

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) onAM News Developed by Kalavati Technologies