BIG BOSS फेम कन्नड अभिनेत्री जयश्री रमैयाची आत्महत्या

कन्नड चित्रपट अभिनेत्री जयश्री रमैयाने बंगळुरु येथील एका पुनर्वसन केंद्रात गळफास लावून आत्महत्या केल्याने सोमवारी खळबळ उडाली.

बंगळुरु | कन्नड चित्रपट अभिनेत्री जयश्री रमैयाने बंगळुरु येथील एका पुनर्वसन केंद्रात गळफास लावून आत्महत्या केल्याने सोमवारी खळबळ उडाली. अनेक महिन्यांपासून जयश्री नैराश्याने ग्रस्त असल्यानेच तिने  हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येत  असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या 'बिग बॉस कन्नड सीजर -3' मध्ये भाग घेतल्यानंतर ही अभिनेत्री प्रकाश झोतात आली होती. या अभिनेत्रीने उप्पा हूलि खरा व कन्नड गोथिला या चित्रपटांत भूमिका बजावल्या. नैराश्याचा सामना करणाऱ्या  या अभिनेत्रीने गतवर्षी जून महिन्यात फेसबुकवरुन स्वत:चे आयुष्य संपवण्याबद्दल संकेत दिले होते.AM News Developed by Kalavati Technologies