अनुराग कश्यपची मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, डिलीट केलं ट्विटर अकाउंट

मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणेच बंद करतो. गुड बाय.

मुंबई | नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकणारा दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपले अधिकृत ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. अनुराग कश्यप अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिला आहे. अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन, मेसेज येत होते. याच कारणांमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यामागचे कारणही स्पष्ट केले होते.

अनुरागने आपले ट्विटर अकाउंट डिलीट करण्यापूर्वी पोस्ट करत लिहिले की,''ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येतात. तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत असणार आहे. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा'', असे ट्विटर अनुरागने केले आहे.

अनुरागने अजून एक ट्विट केले आहे. तो म्हणतोय की, ''तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावी ही इच्छा आहे. हे माझं अखेरचं ट्विट आहे. कारण मी माझं ट्विटर अकाऊंट आता बंद करतोय. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणेच बंद करतो. गुड बाय.''

खरंतर अनुराग कश्यप ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टपणे विचार मांडणात असतो. मात्र त्याच्या अनेक व्यक्तव्यांमुळे त्याला ट्रोलही केले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने जम्मू-काश्मीरबाबतच्या 370 कलम हटवण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. कलम 370 हटवण्याचे काम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे ते भीतीदायक आहे. यासोबतच हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचेही तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर अनेक स्तरांमधून टीका करण्यात आली होती.AM News Developed by Kalavati Technologies