'या' अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, अफवांना दिला पूर्णविराम

लग्नाची अफवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार पसरवली जात होती

मुंबई | सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी ने आपल्या वाढदिसानिमित्त आपल्या चाहत्यांना एक गोड सप्राईझ भेट दिली आहे. सोनाली कुलकर्णी ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर साखरपुड्याचेे फोटो पोस्ट केले आहे. सोनाली कुलकर्णी आणि बिझनेसमन कुणाल बेनरोडकर सोबत फेब्रुवारी मध्ये दुबई ला यांचा साखरपुडा पार पडला होता.

साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना सोनाली म्हणते " आमचा २-२-२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आंदन तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस (सोनाली कुलकर्णी चा वाढदिवस) असू शकत नाही अस मला वाटत. आपले शुभ आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या". दरम्यान, सोनालीच्या लग्नाची अफवा गेल्या काही दिवसांपासून वारंवार पसरवली जात होती पण या अफवांना खात पाणी घालू नका असे सोनाली ने अनेक मुलाखतीमध्ये सांगितले होते. अखेर आता या सर्व अफवांना सोनालीने पूर्णविरम दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies